User candidate must login to Google/Gmail account for submitting online apprentice application form. Any further official communication shall be done only on the email id of the candidate and hence candidate must remember his or her user ID and Password.
Read all the form carefully before finally submitting the online application form.
Form once submitted finally cannot be edited afterwards and no changes are allowed in the form which is finally submitted thus candidate has to take all precautions for filling of the correct online application form.
Maximum file size of attachment e.g. photo, mark sheet, other documents should not be more than 500 KB.
Candidate must upload their original scanned documents with 350 dpi resolution.
Influencing/pressurizing the management for selection as a apprentice, directly & or indirectly through political, non-political or by any other means/ways shall disqualify the candidature of the concerned applicant.
Women candidates whose ITI If the name before marriage is mentioned on the mark sheet and the surname is changed after marriage then it is mandatory to attach your marriage certificate, Government Official Gazette or other government document.
ऑनलाईन शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याकरिता वापरकरता उमेदवाराने Google/Gmail खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे. पुढील कोणताही अधिकृत संवाद फक्त उमेदवारांच्या ईमेल आयडीवर केला जाईल आणि म्हणूनच उमेदवाराने त्याचा वापरकरता आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म शेवटी काळजीपूर्वक वाचावा आणि बरोबर असल्याची खात्री करूनच SUBMIT करावा.
एकदा ऑनलाईन SUBMIT केलेल्या अर्जामध्ये नंतर कुठलाही बदल अथवा दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे उमेदवाराने अंतिमतः ऑनलाइन अर्ज सादर करताना योग्य ती संपूर्ण काळजी/खबरदारी घ्यावी जेणेकरून उमेदवाराचा अर्ज अपूर्ण न राहता त्यामध्ये संपूर्ण माहिती योग्य व अचूक राहील.
उमेदवारांची ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संलग्नकाची (Attachment) उदा. फोटो, मार्क शीट, इतर कागदपत्रे याचा जास्तीत जास्त फाइल आकार 500 KB पेक्षा जास्त नसावा.
उमेदवाराने त्यांची मूळ स्कॅन केलेली स्पष्ट दिसणेकरिता कागदपत्रे 350 डीपीआय रिझोलेशनसह अपलोड करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने शिकाऊ उमेदवारीकरिता निवड यादीत नाव समावेश करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करण्यासाठी कुठलाही राजकीय/अराजकीय किंवा अन्य कुठल्याही मार्गाने किंवा अन्य माध्यमातून प्रशासनावर दबाव आणल्यास संबंधीत अर्जकर्त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
ज्या महिला उमेदवारांच्या आय.टी.आय. मार्क शीट वर लग्नाअगोदरच्या नावाचा उल्लेख असल्यास लग्नानंतर आडनाव बदलेले असल्यास त्यांनी आपले लग्नाचे प्रमाणपत्र, सरकारी अधिकृत राजपत्र (Government Official Gazette किंवा इतर सरकारी दस्तऐवज जोडणे अनिवार्य आहे.